paneer butter masala recipe 1 रेड ग्रेव्ही/पनीर बटर मसाला

paneer butter masala recipeसाहित्य : पाव किलो ताजं पनीर, दोन मोठे कांदे, छोट्या बिटाचा तुकडा, चार पिकलेले लालबुंद टोमॅटो, अर्धी वाटी काजू, पाव वाटी खसखस, एक टे. स्पून आलं- लसूण पेस्ट, पाऊण वाटी तेल, फोडणीसाठी अख्खा मसाला- दोन-तीन हिरव्या वेलच्या, एक चक्रीफूल, एक दालचिनीचा तुकडा आणि दोन-तीन मिरे, दोन टी स्पून लालभडक तिखट, एक-दोन टे.स्पून साखर (आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी- जास्त करता येईल), अर्धी वाटी फ्रेश क्रीम किंवा साय, दोन-तीन टे.स्पून साजूक तूप, हळद, मीठ, गरम मसाला, एक किसलेला चीजक्यूब, कोथिंबीर, स्मोकी फ्लेवर हवा असेल तर दोन-तीन कोळसे, दोन टे. स्पून बटर.

paneer butter masala recipeकृती

कृती : काजू आणि खसखस कोमट पाण्यात दोन-तीन तास भिजवून ठेवावी.

paneer butter masala recipeटोमॅटो आणि बीट चिरून मऊ वाफवून त्यांची अगदी एकजीव प्युरी बनवून घ्यावी. कांदा चिरून त्यात आलं, लसूण आणि थोड्या कोथिंबिरीच्या अगदी कोवळ्या काड्या बारीक चिरून घालाव्या. मिक्सरवर हे मिश्रण वाटून घ्यावं. एकीकडे पनीरचे आवडीप्रमाणे तुकडे करून ठेवावे. नंतर पॅनमध्ये तेल तापायला ठेवावं. तेल तापलं की त्यात वेलची, चक्रीफूल, दालचिनी आणि मिरे घालून गॅस बारीक करावा. दोन टी स्पून तिखट आणि एक टी स्पून साखर घालून भराभर ढवळावं.

तिखट काळं व्हायच्या आत त्यात कांद्याचं वाटण घालून ढवळावं. मिश्रण परतत राहावं. paneer butter masala recipeतेल सुटल्यावर त्यात एक टी स्पून हळद घालावी. नंतर टोमॅटो प्युरी घालून पुन्हा परतावं. तेल सुटल्यावर काजू आणि खसखशीची एकजीव पेस्ट करून ती मिश्रणात घालावी. बारीक गॅसवर परतत राहावं. तेल सुटल्यावर भाजीत मीठ, दोन टी स्पून गरम मसाला आणि पनीरचे तुकडे घालावे. दोन टे. स्पून साखर, फ्रेश क्रीम किंवा घोटलेली साय आणि अर्धं चीज घालून पाच मिनिटं झाकण ठेवावं.

paneer butter masala calories

paneer butter masala recipeस्मोकी फ्लेवर

paneer butter masala recipeस्मोकी फ्लेवर हवा असेल, तर एका उभट स्टीलच्या ग्लासमध्ये दोन-तीन निखारे ठेवून तो ग्लास तयार भाजीमध्ये नीट उभा राहील असा ठेवावा. त्यावर दोन टी स्पून तूप सोडावं. भाजीवर झाकण ठेवून त्यावर वजन ठेवावं. गॅस बारीकच ठेवावा. पाच मिनिटांनी गॅस बंद करून झाकण तसंच ठेवावं. थेट खाण्याच्या वेळेलाच भाजीवरचं झाकण काढावं. वरून किसलेलं चीज, बटर आणि कोथिंबीर घालून नान, तंदुरी रोटी किंवा पोळीबरोबर तयार भाजी खायला द्यावी.

paneer butter masala restaurant style

पनीर बटर मसाला या भाजीसाठीची कृती ही रेड ग्रेव्हीची प्राथमिक कृतीच आहे. त्यामुळे याच ग्रेव्हीचा वापर करून रेड ग्रेव्हीमध्ये बनणाऱ्या अन्य भाज्याही बनवता येतात.

2 thoughts on “paneer butter masala recipe 1 रेड ग्रेव्ही/पनीर बटर मसाला”

Leave a comment