6 months baby foodनवजात बाळाचं संगोपन (सहा महिने ते एक वर्ष)

6 months baby food बाळ चार-सहा महिन्यांचं झालं, की हळूहळू बाळाला आपल्या खाण्याच्या आपल्या स्वच्छ बोटांनी चाटवला आणि बाळानं तो आवडीनं चाखला, तर समजा हीच वेळ आहे बाळाला थोडं थोडं वरचं खाणं द्यायला सुरुवात करायची. पोषणदृष्ट्या सहा महिन्यांच्या बाळासाठी आईच्या दुधाबरोबरच वरचा आहार देणं आवश्यक ठरतं.

साधारणतः वरणाच्या पातळ पाण्यापासून सुरुवात करून हळूहळू खिमटाचे विविध प्रकार, खीर, शिरा, नाचणीसत्त्व, विविध फळांचे गर, सूप्स असे पदार्थ बाळाला द्यावेत. कोणताही पदार्थ बनवताना आपण सहजच त्यात मीठ-साखर घालतो, पण बाळाला अगदी सुरुवातीपासूनच खूप जास्त मीठ-साखरेची सवय लावू नये. हेच वय आहे बाळाची चव विकसित करण्याचं. सुरुवातीला बाळाच्या आहारात अगदीच कमी मीठ-साखर असावी. मसाले तर वयाच्या दोन वर्षांनंतरच पदार्थांत घातलेले चांगले.

6 months baby foodबाळाशी हितगुज

सुरुवातीला बाळाला प्रत्येक पदार्थाची नैसर्गिक चव अनुभवू द्यावी. कोणताही नवीन पदार्थ बाळाला देताना आधी एक-दोन चमचेच द्यावा. नंतर हळूहळू प्रमाण वाढवावं. एकाच दिवशी खूप वेगवेगळ्या चवींशी ओळख करून देऊ नये. साधारण सात-आठ दिवसांनी दुसरा नवीन पदार्थ द्यायला हरकत नाही. बाळाला खायला घालण्याची वेळ घाईगडबडीची नसावी.

रोज शक्यतो एकाच वेळेस बाळाला खायला घालावं. बाळाला सुरुवातीला एकाच वेळेला वरचं खाणं द्यावं. आठ-नऊ महिन्यांनंतर दिवसातून दोनदा वरचं खाणं द्यावं. साधारण दहाव्या महिन्यांनंतर दिवसातून दोनदा वरचं खाणं द्यावं. या दोन खाण्यांशिवाय बाळाचं स्तनपान सुरू ठेवावं. साधारण बारा ते पंधरा महिन्यांपर्यंत तीनदा वरचं खाणं आणि मागेल तेव्हा स्तनपान योग्य ठरतं.

7 month baby food chart

वरचं खाणं सुरू केल्यावर बाळाला पाण्याची गरज असते. आधी चमच्यानं किंवा छोट्या ग्लासनं आपण बाळाला पाणी पाजावं. बाळाला1 year baby food बसता यायला लागलं, की एखादं बोथट स्पाउटचं सिपर बाळासाठी आणावं, अशा सिपरमुळे बाळाला हवं तेव्हा पाणी पिता येतं. बाळाला आहारातून प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्स मिळायला हवीत. सामान्यतः आपली भारतीय आहाराची कॉम्बिनेशन्स पोषणदृष्ट्या उत्तम असतात. फक्त भारतीय आहारात गहू आणि तांदळाचं प्रमाण जास्त असतं. या भारतीय आहारपद्धतीला डाळी, भाज्या आणि स्थानिक फळांची भरभक्कम जोड द्यायला हवी.

‘न्यूट्रिशन मॉनिटरिंग ब्युरो’च्या म्हणण्यानुसार भारतात6 months baby food मोठ्या प्रमाणात कुपोषित मुलं असतात. या मुलांमधली २५ टक्के प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांच्या आहारात तेलबियांचं प्रमाण वाढायला हवं. विशेषतः सोयाबिनच्या आहारातल्या वापरामुळे तेल आणि प्रोटीन्सची गरज पूर्ण होते. सोयाबिन्स भाजून त्याचं पीठ करून मुलांच्या आहारात वापरावं. भाजल्यामुळे सोयाबिन्स पचायला सोपे होतात. सोयाबिन्सचं पीठ मुलांच्या आहारात विविध प्रकारे वापरलं, तर मुलांना आवश्यक ते पोषण मिळतं. बाळाच्या आहारात विविध धान्यं, डाळी, फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य, तेलबिया, सुकामेवा, फळं, दूधदुभतं या सगळ्यांचा समावेश असलेल्या चौरस भारतीय आहाराला जोड म्हणून सोयाबीन्सचा वापर व्हावा.

6 months baby foodबाळाच्या पोषणतत्वांची गरज

दुधातून ‘बी-१२’ मिळतं, पण दह्यात ते जास्त असतं. पालेभाज्यांमधून फोलिक अॅसिड मिळू शकतं, तसंच लोखंडी कढयांमध्ये पदार्थ शिजवले, तर आयर्नचा लाभ होतो. सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन ‘डी’ वाढतं. हे सगळं आपल्याला माहीत असलेले आरोग्याचे नियम आहेत.

बाळ जसं वरचं खाणं खायला लागेल, तसं त्याचं दुधाचं प्रमाण कमी करत जावं. एक वर्षाच्या आत बाळाला साधारण दर दोन ते तीन तासांनी थोडं थोडं खाणं किंवा दूध द्यायला हवं.

baby food

काही बालरोगतज्ज्ञांच्या मते एक वर्षाच्या आतल्या मुलांना जास्त मसालेदार, अति गोड पदार्थ देऊ नये. एक वर्षाच्या आतल्या मुलांना अंड्याचा पांढरा बलकही देऊ नये. फक्त पिवळा बलक द्यावा, असं डॉक्टर्स म्हणतात. एक वर्षानंतर पूर्ण अंडं द्यायला हरकत नसते. खूप जास्त प्रमाणात मिक्स डाळी, खूप साखर असलेलं नाचणी सत्त्व, मैद्याची बिस्किटं, चीज, बटर, लसणासारखे तीव्र मसाले देऊ नयेत. प्रिझर्वेटिव्ह्न घातलेले कोणतेच पदार्थ बाळाला एक वर्षापर्यंत देऊ नयेत.

बाळ6 months baby food जर किसलेलं किंवा मॅश केलेलं सफरचंद खाऊ शकत असेल, तर ते शिजवून देण्यापेक्षा तसंच द्यावं. कारण अॅपल शिजवल्यामुळे त्यातल्या आयर्नचा नाश होतो, असं नवीन डॉक्टरांचं मत आहे.

* काही / बहुतेक बाळं दूध पाजल्यानंतर थोडंसं दूध बाहेर काढतात. दूध पिताना बाळाच्या पोटात जी हवा जाते, ती दूध पिणं झाल्यावर बाहेर येते. त्याबरोबर पोटातलं थोडंसं दूधही बाहेर येतं. ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे. दूध पाजल्यानंतर बाळाला कडेवर घेऊन त्याच्या पाठीवर थोपटावं किंवा हात फिरवावा म्हणजे बाळाला ढेकर येऊन पोटातली हवा बाहेर निघून जाईल.

*रडणं हीच बाळाची भाषा असते. तहान, भूक, शी-शू, पोटदुखी या सगळ्यासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी बाळ रडतं. पहिल्या दोन-तीन महिन्यांत काही काही बाळं संध्याकाळी ठरावीक वेळेला रडतात. त्याला Evening colic म्हणतात. बाळाच्या रडण्याचं कारण शोधून त्यावर उपाययोजना करावी. तरीही बाळ रडत असलं, तर बाळाला कुशीत घेणं, कडेवर घेऊन थोपटणं, बोलणं, गाणं म्हणणं, झोके देणं, खुळखुळा वाजवणं, बाहेर चक्कर मारून आणणं, असे प्रयत्न शांतपणे करून बघावेत. तरीही बाळ रडत असलं, तर बाळाचे कपडे व्यवस्थित बघून काही कीडामुंगी नाही ना, हे बघावं. तरीही बाळाचं रडणं थांबलं नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाळाची हालचाल

बाळाच्या6 months baby food जेवणाखाण्याएवढंच बाळाच्या हालचालीलाही महत्त्व असतं. कारण खाऊन बाळाची फक्त जाडी वाढते. बाळाचे स्नायू वाढणं, हाडं मजबूत होणं यासाठी खेळणं, व्यायाम आवश्यक आहे.

खेळामुळे बाळाचा सर्वांगीण विकास होतो. खेळामुळे बाळाची शारीरिक शक्ती वाढते. ‘हँड अँड आय को-ऑर्डिनेशन’ वाढतं. अगदी लहान बाळांना रंगीबेरंगी खुळखुळे, बॉल्स, विविध मेकॅनोसारखे गेम्स उपयुक्त ठरतात. थोड्या मोठ्या मुलांना रंग आणि कागद, बॅट-बॉल, रिंग्ज या वस्तू आवडायला लागतात. बाळ अगदी लहान असताना रडणं, हातपाय हलवणं हाच बाळाचा व्यायामही असतो आणि खेळही. थोडं मोठं झाल्यावर, चालायला लागल्यावर बाळाला बरोबरीच्या मुलांमध्ये खेळायला आवडतं. मुलांवर अशा खेळण्याचा सकारात्मक परिणाम होतो.

चार-सहा महिन्यांपासूनच, हवामानाचा विचार करून बाळाला संध्याकाळी मोकळ्या हवेत ग्रॅममधून फिरायला न्यावं. चालता-पळता आल्यावर मुलांनी संध्याकाळी तास-दोन तास मोकळ्या हवेत खेळायला हवं. मुलांनी खेळणं, पळणं, डान्स, सायकलिंग, दोरीच्या उड्या, सूर्यनमस्कार असे विविध व्यायाम करावेत.

संध्याकाळी खेळण्याबरोबरच सकाळच्या वेळेला मुलांच्या अंगावर भरपूर सूर्यप्रकाशही पडला, तर त्यांना भरपूर व्हिटॅमिन ‘डी’ मिळू शकतं. व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता सध्या सामान्य झाली आहे, जी सूर्यप्रकाशाशिवाय फक्त औषधांनीच भरून निघू शकते.

मुलं संध्याकाळी छान खेळून घरी आली, तर त्यांना भूकही छान लागते. काही कटकट न करता मुलं व्यवस्थित जेवण करतात. शिवाय संध्याकाळी बाहेर खेळल्यामुळे दमून लवकर झोपतातही. त्यामुळे मुलांना टीव्ही पाहायला ना वेळ राहतो, ना इच्छा. एकूण काय, तर मुलांनी दिवसभरात तास-दोन तास मोकळेपणानं खेळायला हवं!

Leave a comment