hot and sour veg soupसूपचे प्रकार1

hot and sour veg soupसूप करण्यामागचा मूळ उद्देश मिनरल्स मिळावीत हा आहे. बऱ्याच वेळा अन्नपदार्थांतला टाकाऊ भाग उदाहरणार्थ, मटणाची हाडं, अंड्याची टरफलं, माशांचे काटे, भाज्यांचे देठ, सालं इ. जिन्नस उकळून घेण्याची पद्धत पाश्चात्त्यांकडे आहे, त्याचाही अर्थ हाच. या टाकाऊ पदार्थांतून मिनरल्स सूपच्या पाण्यात उतरवू द्यायची आणि ते पदार्थ गाळून घेऊन टाकून द्यायचे. या पाण्याला स्टॉक असं म्हणतात. शाकाहारी लोकांनाही असं करता येईल. वाटाण्याची सालं, इतर देठ व सालं इत्यादी उकळून घेऊन त्याचा उपयोग सूपच्या पाण्यासाठी करता येईल. मग त्यात स्वाद आणण्यासाठी प्रत्यक्ष मटण, मासे, अंडी, कडधान्यं, भाज्या घालून त्याचं त्या त्या पदार्थाचं नाव देऊन सूप बनवायचं.

सूपच्या फायदा म्हणजे जठाराग्नीला चालना मिळते आणि पचन, भूक कमी असेल, तर सूप पिऊन शरीर तग धरू शकतं. आजारपणामध्ये वा आजारपणानंतर सूपचा उपयोग फारच चांगला होतो. पातळ सूप भूक वाढवतं. दाट सूप पोट भरण्याचं समाधान देतं. जेवणात मुख्य पदार्थ फार जड नसतील, तर सूप दाट असावं. याचं उदाहरण म्हणजे चायनीज जेवण. दुपारी नुसतंच सूप घेणं चांगलं. तसंच रात्री जड जेवण होणार असेल तर दुपारी सूप घेणं चांगलं. सूप करताना टोमॅटो व पालक या दोन वस्तूंचा अतिरेक टाळावा.

hot and sour veg soupया विभागात सूपचे तीन थोडे वेगळे प्रकार दिले आहेत. ते साधारण पोट भरणारे आहेत.

hot and sour veg soupमराठमोळं कॉर्नसूप

sweet corn soup

साहित्य : दोन वाट्या मक्याचे दाणे (नसल्यास मटार), पाव चमचा आलं किसून, प्रत्येकी एक कप घुसळलेलं दही, टोमॅटो रस, नारळाचं दूध, पाव कप चण्याचं पीठ, एक ते दीड लिटर पाणी, चवीला गूळ, एक टी स्पून तेल, मीठ, जिरं, एक छोटी मिरची तुकडे करून.

कृती : तेलावर जिरं, आलं, मिरची यांची फोडणी करून दाणे टाकावे. त्यावर दही-टोमॅटो-नारळाचा रस, बेसन आणि पाणी यांचं मिश्रण ओतून दाणे शिजू द्यावे. शिजल्यावर मीठ, गूळ चवीला घालावा. प्यायला देण्याच्या अगोदर पुन्हा उकळी काढून त्यात नूडल्स घालून शिजवावं. वाढून घेताना बाऊलमध्ये थोडं सूप, दाणे, नूडल्स असं घेऊन वरून साय किंवा चीज घालावं. बरोबर ब्राऊन ब्रेड घातल्यास चांगलं.

hot and sour veg soupया सूपची थोडक्यात कल्पना टोमॅटोच्या सारावरून घेतली आहे. नेहमीच्या चायनीज कॉर्नसूपपेक्षा थोडी वेगळी आणि मराठमोळी पद्धत.

सूचना : याच्याबरोबर भाजीची डिश चालू शकेल किंवा गाजरभातही चालेल.

hot and sour veg soupबार्लीचं सूप

vegetable soup

साहित्य : अर्धा कप रवा, अर्धा कप पाणी एकत्र भिजवून ठेवावं, अर्धा कप मध्यम आकाराचे बार्लीचे दाणे, सहा कप पाणी, चार चिकन सूपच्या वड्या किंवा नळ्यांचं सूप किंवा भाज्यांचं/डाळींचं पाणी सहा कप, दीड कप बारीक चिरलेला कांदा, दोन डाव भरून तेल, चवीपुरतं मीठ, मिरची, मूठभर किंवा अधिक चिरून कोथिंबीर, एक मोठा कप भरून दही.

कृती : बार्लीचा डबा उघडून घ्यावा आणि सहा कप पाण्यात घालून शिजवावा. मंद आचेवर एक तास लागेल, तर कुकरमध्ये लवकर होईल. बार्ली शिजल्यावर भिजलेला रवा घालून उकळावं. यामुळे सूप दाट होईल. त्यानंतर तेलात परतून घेऊन लाल करून कांदाही त्यातच मिसळावा. चवीला मीठ, मिरची घालून तयार ठेवावं. वाढण्याच्या वेळेस दही मिसळावं.

सूचना :

१) दही नको असल्यास टोमॅटोचा गर घालता येईल.

२) मुळ्याचे पराठे किंवा त्या भागातला एखादा पदार्थ आणि कच्ची कोशिंबीर असा पूर्ण मेनू होऊ शकेल.

३) बार्ली नसेल तर त्याऐवजी मुगाची डाळ वापरता येईल.

hot and sour veg soupगाजराचं सूप

carrot soup for babies

साहित्य : आठ मध्यम आकाराची गाजरं किसून, एक टी स्पून तेल, एक टी स्पून लोणी, तीन मध्यम कांदे चिरून, चार कप पाणी, एक मोठा कप भरून घुसळलेलं दही, एक मोठा चमचा कोथिंबीर, मिरचीपूड-मिरपूड, चवीपुरतं मीठ.

कृती : तेल अधिक लोणी जाड बुडाच्या पातेल्यात तापवून घ्यावं. त्यावर गाजर आणि कांदा परतून घेऊन पाणी घालावं. शिजल्यावर दही, साय, मीठ, मिरपूड घालून उकळी न येईल या बेतांनं गॅसवर ठेवावं, उकळी फुटण्याच्या आत खाली उतरवावं.

सूचना : १) गाजराच्या ठिकाणी पालक वापरता येईल.

२) गाजराबरोबर फरसबी, फ्लॉवर इ. मिश्र भाज्या वापरता येतील.

३) राजमाप्रमाणे एखादं कडधान्यही भिजवून वापरता येईल.

Leave a comment