breakfast recipesझटपट दहीवडाbreakfast recipesकैरीची वाटली डाळ2

breakfast recipesएप्रिल म्हणजे कडक उन्हाळा. या दिवसांत भाज्याही फारशा मिळत नाहीत. ज्या असतात, त्यालाही काही चव नसते. खायचीही कुणाला इच्छा नसते, ना तोंडाला चव असते. अशा रूक्ष, नीरस वाटणाऱ्या महिन्याला आंब्यानं मात्र श्रीमंत केलंय… आंबा, कैरी, कलिंगड हे सगळं या महिन्यात भरपूर उपलब्ध असतं. ब्रेकफास्टमध्ये शक्य असेल तर आंबा जरूर खावा. नुसता आंबा खाण्याशिवाय मँगोशेक, सांदणं, शिरा असे आंब्याचे पदार्थ; तर कैरीची डाळ, कैरी घालून चित्रान्न, चटणी असे कैरीचे पदार्थ या महिन्यात ब्रेकफास्टसाठी अवश्य बनवावे. कच्चा कांदा, कैरी, कोथिंबीर, पुदिना वापरून विविध पदार्थ या दिवसांत ब्रेकफास्टसाठी उत्तम ठरतात. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत मसालेदार, तिखट पदार्थांपेक्षा आंबटगोड चव खायला चांगली वाटते आणि हवामानाच्या दृष्टीनं तब्येतीसाठी उत्तम ठरते.

एप्रिल महिना म्हणजे वर्षभरासाठीच्या पदार्थांच्या वाळवणांचे दिवस. कुरडया, पापड, खारोड्या, शेवया, आंबोशी हे पदार्थ या दिवसांत बनवले जातात. कुरडया करण्याच्या दिवशी गव्हाचा चीक लहानपणी सगळ्यांनीच आवडीनं खाल्ला असेल. आता अगदी घरोघरी कुरडया बनवल्या जात नसल्यामुळे चीकही खाण्यात येत नाही. पण गव्हाचं सत्त्व बाजारात तयार मिळतं. ते वापरून अगदी झटपट, छान आवडीच्या चवीचा चीक बनवता येऊ शकतो.

breakfast recipesएप्रिल महिन्यात हे साहित्य आवर्जून वापरावं –

कच्चा कांदा, कैरी, आंबा, दही, ताक, कोथिंबीर

1)breakfast recipesझटपट दहीवडा

Dahivada

साहित्य : सात-आठ बटर (बेकरीमधे मिळणारे टोस्टसारखे जिरा किंवा प्लेन बटर), दीड वाटी ताजं घट्ट दही, एक टी-स्पून आलं-मिरची पेस्ट, मीठ, साखर, कोथिंबीर, प्रत्येकी एक टी-स्पून जिरं पावडर आणि लाल तिखट, चिंचेची चटणी, पुदिना चटणी (ऐच्छिक), चाट मसाला, एक वाटी दूध.

कृती : दही व्यवस्थित फेटून घ्यावं. त्यात मीठ, साखर, आलं-मिरची पेस्ट आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित ढवळून घ्यावं. थोडंसं दूध घालून दही सरसरीत करून घ्यावं. एकीकडे बटर कोमट पाण्यात अर्धा मिनिट बुडवून निथळून बाऊलमध्ये ठेवावे. त्यावर एक डावभर तयार दही घालावं, त्यावर थोडी चिंचेची चटणी, पुदिना चटणी घालावी. वरून जिरं पावडर, लाल तिखट आणि चाट मसाला भुरभुरावा. थोडी कोथिंबीर घालावी. अजिबात तेलाचा वापर नसलेला हा पदार्थ चटकन होतो.

breakfast near me

2) कैरीची वाटली डाळbreakfast recipes

साहित्य : एक वाटी हरभराडाळ, पाव वाटी कैरी, दोन-तीन मिरच्या, कोथिंबीर, मीठ, साखर, फोडणीचं साहित्य आणि तेल.

कृती : हरभरा डाळ धुऊन थोड्याशा पाण्यात कमीत कमी चार-पाच तास भिजवावी.

breakfast recipes

रात्रभर भिजवणार असाल, तर डाळ भिजवून फ्रीजमध्ये ठेवावी. कैरी किसून घ्यावी. एका मिरचीचे फोडणीसाठी तुकडे करून ठेवावे. बाकी दोन मिरच्या आणि डाळ मिक्सरमध्ये भरड वाटून घ्यावी. वाटताना शक्यतो पाणी घालू नये. वाटलेल्या डाळीत कैरीचा कीस, मीठ, साखर घालून मिश्रण ढवळावं. दोन-तीन टे. स्पून तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात किंचित हळद आणि हिंग घालावा. नंतर त्यात मिरच्या घालून फोडणी ढवळावी. गॅस बंद करावा. फोडणी थोडी थंड झाली, की डाळीवर घालावी. डाळ व्यवस्थित हलवून घ्यावी. सर्वात शेवटी डाळीवर कोथिंबीर पेरावी. कैरीची डाळ जर डब्यात द्यायची असेल, तर ती डब्यात भरताना गार करूनच भरावी. कारण फोडणीमुळे गरम झालेली डाळ लगेच डब्यात भरली गेली. तर ती खराब होऊ शकते. आरोग्यदायी, चविष्ट अशी आंब्याची/कैरीची डाळ उन्हाळ्यात वरचेवर आहारात असावीच.

Dahivada

1 thought on “breakfast recipesझटपट दहीवडाbreakfast recipesकैरीची वाटली डाळ2”

Leave a comment