साहित्य : अर्धा किलो gulab jamunगुलाबजामचा खवा, ५० ग्रॅम आरारूट/ पन्नास ग्रॅम कॉर्नफ्लोअर, अर्धी वाटी वाफवलेला बारीक रवा,एक चिमूटभर बेकिंग सोडा, अंदाजे पाव कप दूध, तळण्यासाठी अर्धा लिटर रिफाईंड तेल.
गुलाबजामच्या पाकासाठी : एक किलो साखर, पाच-सहा वाट्या पाणी, वेलचीची पूड.
Table of Contents
gulab jamunखव्याचे गुलाबजामची कृती
१) गुलाबजामचा खवा वेगळा मिळतो तो शक्यतो ताजा अर्धा किलो घ्यावा. पन्नास ग्रॅम कॉर्नफ्लोअर, अर्धी वाटी वाफवलेला बारीक रवा आणि चिमूटभर बेकिंग सोडा खव्यात मिसळून मिक्सरमधून काढावा म्हणजे फारसं मळायला लागणार नाही. नंतर दुधाचा हात लावून मिश्रण हाताला हलकं, फुसफुशीत आणि सहजपणे गोळे वळता येतील असं असायला हवं. वाफवलेल्या रव्यामुळे हलकेपणा येतो, सोडा कमी लागतो.
२) एक किलो साखरेत पाच-सहा वाट्या पाणी घालून गॅसवर ठेवावा. अधूनमधून ढवळत राहा. पहिल्यांदा साखर विरघळेल, मग पाक उकळायला लागेल आणि पाकाला फेस यायला लागेल. आता पाक उतरवून घ्यावा. पाकात वासाला वेलचीची पूड, हवा असल्यास केशरी रंग घालावा आणि अर्धा पाक पसरट भांड्यात काढून ठेवून उरलेल्या पाकात वाटीभर पाणी घालावे.
३) अर्धा लिटर रिफाईंड तेल तापत ठेवा. तेल चांगलं तापलं, की गॅस बारीक करा आणि मळलेल्या खव्याचे दोन-तीन लहान गोळे तेलात घालून तळून बघावे. प्रत्येक गोळा आतपर्यंत स्पाँजी झाला तर ठीकच आहे, नाहीतर परत थोडा सोडा आणि दुधाचा हात लावून खवा मळून घ्यावा लागेल.
गुलाबजाम चांगला सच्छिद्र झाल्याची एकदा खात्री पटली, की तापलेल्या तेलात दहा- बारा गोळे टाकून कढई थोडी उचलून गोल गोल फिरव, आधी झारा लावू नकोस. आतले गुलाबजाम अलगद तळले जातील. गोळ्यांना किंचित गुलाबी रंग आला, की मग झाऱ्यानं तेल उडवत गुलाबजाम लालसर रंगावर तळून काढावे.
हे तळलेले गुलाबजाम पहिल्यांदा कागदावर आणि नंतर काढून ठेवलेल्या पाकात घाल. पाकात घातलेले गुलाबजाम पाक पिऊन फुगत जातील. पाक गार व्हायला लागेल. थोड्या थोड्या वेळानं, पाणी घातलेला पाक गरम करून गुलाबजाम वर ओतत राहा. दोन-चार तासांनी गुलाबजाम पाकात चांगले मुरतात.
gulab jamunअर्धा किलो खव्याचे मध्यम आकाराचे ८०-९० गुलाबजाम होतात.
*खव्यामध्ये घालायच्या सोड्याचं प्रमाण अगदी नेमकं सांगता येत नाही. तो जर का जास्त झाला, तर गुलाबजाम तेलात फुटून पसरण्याची शक्यता असते. कमी झाला तर तो आतून दडदडीत राहतो. म्हणून सोड्याचं प्रमाण ट्रायल करूनच ठरवायचं.
*गुलाबजाम तुपात तळले तर काहीच हरकत नाही; पण गुलाबजाममधलं तूप कागदावर नीट निथळलं नाही, तर पाकावर तुपाचा थर येतो. ते जर फ्रिजमधे ठेवले तर हा थर घट्ट होतो आणि थिजलेलं तूप वरच्यावर काढून घेता येतं.
*नुसता खव्याचा गोळा तळला तर तळणीत पसरेल, म्हणून खव्यात कुणी कुणी मैदा किंवा आरारूट पण घालतात.
* दोन वाट्या खव्यात अर्धी वाटी बारीक रवा मिसळून दोन तास ठेवायचा किंवा बारीक रवा दुधात घट्ट भिजवून खव्यात मिसळायचा.
* रव्यामुळे गुलाबजाम खुटखुटीत होतात. आत पाकही चांगला शिरतो.
* रव्याऐवजी मैदा त्याच प्रमाणात घालायचा. मैदा घातलेले गुलाबजाम त्यामानानं लिवलिवीत होतात. मैद्याऐवजी कणीक घातली तरी चालेल; पण कणकेचीही थोडीशी तरी चव लागते. मात्र खमंग लागतात.
* कॉर्नफ्लोअरमुळे थोडे खुटखुटीत पण तरीही मऊ असे होतात.
* शाही गुलाबजाम करायचे असले तर बदाम, पिस्ते, काजू जे काय असेल त्याची पाव वाटी पावडर, चिमूटभर केशर, दोन-तीन गुलाबजाम होतील इतक्या खव्यात मिसळून त्याचे वाटाण्याएवढे गोळे करायचे आणि हे गोळे मधे घालून गुलामजाम वळायचे.
*गुलाबजाममध्ये पनीर पण घालतात. पनीरमुळे पण गुलाबजाम लुसलुशीत होतात. पाव किलो खव्याला अर्धी वाटी पनीर पुरे. पनीर खव्यात मिसळलं म्हणून आणखी रवा वगैरे घालायची गरज नाही.
gulab jamunपण एवढ करूनही गुलाबजाममध्ये पाक शिरला नाही तर काय करायचं ?
*मग गुलाबजाममधला पाक बाजूला काढायचा. दोन वाट्या पाकाला अर्धीवाटी पाणी घालायचं, पाक उकळत ठेवायचा आणि पाकात गुलाबजाम घालून चक्क पाच मिनिटं उकळत ठेवायचे. असे गरमगरम गुलाबजाम पाहुण्यांच्या पानात वाढलेस तर जामून बिघडलं होतं हे कुणाच्या लक्षातही येणार नाही.
* खव्यामध्ये सोडा जास्त झाल्यामुळे तळताना गुलाबजाम फुटून पसरायला लागले तर मात्र खरी पंचाईत. मग एक वाटी खव्याच्या मिश्रणात अर्धी वाटी भाजलेला बारीक रवा, एक वाटी साखर, अर्धी वाटी दूध मिसळून शिजवावे. वेलची पूड घालावी. मिश्रणाचा गोळा होऊन कडा कोरड्या व्हायला लागल्या की तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये थापून वड्या कापाव्या.
* अशा वेळी रवा, मैदा मिसळला तर गुलाबजाम होतील; पण खव्याची चव कमी होईल. त्यासाठी सुरुवातीला सोडा मिसळतानाच काळजी घ्यायची.
2 thoughts on “gulab jamunखव्याचे गुलाब जामून4”